मुलींच्या लग्नाचे योग्य वय किती यावर सरकार लवकरच निर्णय घेणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलींच्या लग्नाचे योग्य वय किती असावे यासंबंधी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, असे आश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच यासंबंधी निणर्य घेण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले. अन्नधान्य व कृषी संघटनेशी संबंधित हिंदुस्थानच्या दीर्घकालिन संबंधांच्या 75 च्या वर्धापनदिनानिमित्त 75 रूपयांच्या स्मृतीचिन्हांचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मोदीं म्हणाले की, लग्न आणि आई होण्याचे वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून 22 सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.