पीएमसी बँक घोटाळा, वाधवान पिता-पुत्र व वरियम सिंगच्या कोठडीत वाढ

589

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग आणि पीएमसीचे माजी अध्यक्ष वरियम सिंग यांच्या पोलीस कोठडीत बुधवारी न्यायालयाने 5 दिवसांची वाढ केली. दरम्यान, पीएमसीच्या ग्राहकांनी न्यायालयाबाहेर निदर्शने करत आरोपींना तुरुंगात टाका, अशी मागणी केली.

पीएमसी घोटाळ्याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायालयाकडे  केली होती. न्यायालयाने ती मान्य केली. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस. जी. शेख यांनी आरोपींना 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पीएमसीमध्ये 4 हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा झाल्याचे उघडकीला आल्यानंतर यातील प्रमुख आरोपींची पोलिसांनी धरपकड केली. दरम्यान, वाधवान पिता-पुत्रांची 3 हजार 500 कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. वाधवान पिता-पुत्र, वरियम सिंग यांच्यासह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या