‘पीएमपीएल’ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 9400 कर्मचाऱ्यांना बोनस

537

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपीएल) 9,400 कर्मचाऱ्यांना व बक्षिसाची रक्कम बुधवारी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. बोनससाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेने पैसे दिले होते. ही रक्कम बुधवारी कर्मचाऱ्यांना देण्यात आली, यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळात एकूण 9,400 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. दरवर्षी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बक्षीस रक्कम देण्यात येते. मात्र, दोन वर्षांपुर्वी तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ‘पीएमपीएलची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बोनस व बक्षिस रक्कम न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कामगार संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने कर्मचाऱ्यांची बाजूने निर्णय दिल्याने बोनस मिळाला. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागला होता.

दरम्यान गतवर्षी अध्यक्षा नयना गुंडे यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना कुठल्याही संघर्षाविना बोनस व बक्षीस रक्कम देण्यात आली. यानंतर यावर्षी देखील बोनस वेळेवर दिल्याने कर्मचाऱ्यांनी अध्यक्षा नयना गुंडे आणि सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर यांना पुष्पगुच्छ देऊन आनंद व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या