
पंजाब नॅशनल बॅंकेतील 13,500 कोटींचा घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी निरव मोदी सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याच्या प्रर्त्यापणासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्याच्या मानसीक स्वास्थासंबधी लंडनमधील न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. आपल्याला हिंदुस्थानात पाठवले तर, आपली हत्या होईल किंवा तुरुगांत आपण आत्महत्या करू, अशी भीती निरव मोदीने व्यक्त केली होती. त्याबाबत त्याच्या मानसीक स्वास्थाबाबत सुनावणी झाली.
हिंदुस्थानात होणाऱ्या प्रत्यर्पणाविरोधात निरव मोदीने लंडन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी झाली. यावेळी निरव मोदीचे मानसोपचारतज्ज्ञ प्राचार्य अँड्र्यू फॉरेस्टर यांनी सांगितलं की, नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. मात्र, या कारागृहात यापूर्वीही अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच तणावामुळे निरव मोदीला नैराश्य आले आहे.
या सर्व बाबींचा विचार करता निरवचे प्रत्यार्पण केल्यास त्याच्या मनातील आत्महत्येचे विचार बळावण्याची शक्यता आहे. तसेच हिंदुस्थानातील तुरुंगात हत्या होण्याची भितीही त्याला आहे. त्याचा मानसिक आजार वाढला असून, त्यासाठी दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. नीरवच्या आईनेही आत्महत्या केली होती. त्यामुळे तो नैराश्यात गेला आहे, असे फॉरेस्टर यांनी न्यायालयाला सांगितलं.
हिंदुस्थानची बाजू मांडताना हेलन माल्कम केसी यांनी म्हटले की, हिंदुस्थानात नीरव मोदीवर खाजगी मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार करण्यात येतील. त्याच्यासह आणखी एका कैद्याला राहण्याची परवानगी असेल. तसेच, त्याच्या वकिलाला दररोज तर आठवड्यातून एकदा कुटुंबाला भेटण्याची परवानगी असेल. नीरव मोदीला ठेवण्यात येणाऱ्या कारागृहात पंखे, वीजेची ठिकाणं काढून टाकण्यात येतील. तसेच, कारागृहात एका खिडकी ठेवण्यात येईल, त्यातून त्याच्यावर नजर ठेवण्यात येणार आहे.
























































