कविता – कायमच स्मरणात राहतील

559

>> दीपक काशीराम गुंडये, वरळी

मराठी अस्मितेचे ज्यांनी पेरले बीज
राज्य केले मनामनावर राखूनी आब
जागविला ज्यांनी मराठी स्वाभिमान
होते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
रोखठोक रांगडी ठाकरी ज्यांची भाषा
मार्मिक विचारातून ज्यांनी उभारली शिवसेना
विरोधकांशी केला ज्यांनी थेट सामना
मनावर बिंबला त्यांचा ठाकरी बाणा
सत्तापदांचा कधी ना मोह धरला
परी सत्ताकेंद्रावर थेट ठेवला अंकुश
वाणीत होती जरब, नजरेत होता धाक
हिंदुहृदयसम्राट ही ओळख ठरली खास
कधी न पुसली जाईल त्यांची प्रतिमा
लक्षात राहिल उंचावलेला आश्वासक हात
सदैव घुमेल कानात धीरगंभीर आवाज
कायमच राहतील बाळासाहेब स्मरणात!

आपली प्रतिक्रिया द्या