
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड दानवाड रोडवर असणाऱ्या सहारा कला क्रीडा मंडळावर शनिवारी इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिराजदार यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगार अड्ड्याच्या चालकाच्या मुसक्या आवळल्या. तर 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. क्लब मालकासह 10 जणांना ताब्यात घेण्यात आले.
तालुक्यातील नवे दानवाड रोडवर असणाऱ्या सहारा कला क्रीडा मंडळ या नावाने चालणाऱ्या अवैध क्लब व मटका अड्ड्यावर शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून 5 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एक चार चाकी गाडी व तीन मोटरसायकलचा समावेश आहे. तर 10 जणांना अटक केली आहे . नूर काले, शिवाजी यादव,रफिक मुल्ला ,रमेश कांबळे ,हनुमंत कुरणे, संजू शिंदे ,सूर्यकांत मस्ती ,बाबा हेरवाडे, संदीप कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे असून याबाबत अधिक तपास कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अविनाश मुंगसे करत आहेत.
































































