
ज्वेलर्सने पॉलीश करण्यासाठी दिलले तब्बल 35 लाख 80 हजारांचे दागिने चोरून दौंड रेल्वे स्थानकावरून मूळगावी पश्चिम बंगालमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत. मशीदुल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 32, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मनोज मन्ना ( रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मन्ना यांचे बुधवार पेठेमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. मागील पाच वर्षांपासून मशीदुल दुकानामध्ये कामाला होता. त्यामुळे मन्ना यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे मन्ना यांनी त्याच्याकडे 35 लाख 60 हजारांचे दागिने पॉलीश करण्यासाठी दिले होते. मात्र, मशीदुलने दागिने घेऊन मूळगावी पळ काढला होता. याप्रकरणी तपास सुरू असल्याताना तो दौंड रेल्वे स्थानकावरून मूळगावी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत दागिने जप्त केले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, शरद वाकसे, वैभव स्वामी, महमंद हनीफ, शौकत शेख, मोहन दळवी, सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी, राकेश क्षीरसागर, मयूर भोकरे, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, अमोल सरडे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.

























































