लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले

2674

औसा पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याने ऑनलाईन लॉटरीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस निरीक्षक यांच्यासाठी 5 हजार व स्वतःसाठी 3 हजार अशी 8000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. राजेंद्र नामदेव कांबळे असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराला औसा येथे ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू करण्यासाठी औसा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी राजेंद्र कांबळे याने आठ हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने आठ हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने औसा येथे सापळा रचला असताना तक्रारदाराकडून 8000 रुपये घेत असताना पोलीस कर्मचारी राजेंद्र कांबळे याला रंगेहात पकडण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे , पोहे संजय पस्तापूरे , लक्ष्मीकांत देशमुख , पो.ना चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, मपोना शिवकांता शेळके , रुपाली भोसले पो. कॉ. सचिन धारेकर , आशिष क्षीरसागर, संतोष गिरी , शिवशंकर कच्छवे यांनी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या