
सामना ऑनलाईन । मुंबई
पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना भांडुपच्या राजीव गांधी नगरात घडली. यात शाहरुख सय्यद शेख (23) गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास शाहरुखला तिघांनी राजीव गांधी नगरात पकडले आणि पूर्वीच्या भांडणाच्या रागातून त्याच्यावर रॉड व क्रिकेट स्टम्पने जबर मारहाण केली. शाहरुखच्या डोक आणि पाठीवर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



























































