छापा टाकून वीस जनावरांची सुटका, दोन हजार किलो गोमांस हस्तगत

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नगर

शहरात झेंडीगेट परिसरामध्ये कत्तल खान्यावर पोलिसांनी छापा मारुन दोन हजार किलो गोमांस हस्तगत करुन २० जिवंत जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी सलिम शब्बीर कुरेशी महंमद सुभान जुबेर, तौफिक युनुस कुरेशी, मुबीन कुरेशी, गयाज कुरेशी, रशिद दंडा यांच्यासह पाच ते सहा जणांना अटक करण्यात आले आहे.

शहरामध्ये अवैध कत्तलखान्यावर सध्या धडक कारवाई मोहिम हाती घेण्यात आली आहे. झेंडीगेट परिसरात कत्तल खान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी गाय, बैल, वासरु अशा २० जनावरांची सुटका केली. या छाप्यात सुमारे दोन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असुन पोलिसांनी या ठिकणावरुन ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या अगोदरच या परिसरात कोतवाली पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई करुन अनेकांवर गुन्हे दाखल केले होते.