रावणाच्या पुतळ्याला पंतप्रधानांचा मुखवटा लावला; सोशल मिडीयावर फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

social-media

दसऱ्यानिमित्त बनवलेल्या रावणाच्या पुतळ्याचा फोटो एडिट करत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे मुखवटे लावण्यात आले. त्यानंतर ते फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आले. या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रावणाचा पुतळा एडिट करून त्याच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे मुखवटे लावण्यात आले. त्यानंतर ते फोटो सोशल मिडीयवर व्हायरल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. जलोदिया येथील कुंदनसिंह गौतम यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

खोकरिया गावातील राजवीर बनेसिंह याने रावणाचा फोटो एडिट करत सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. या फोटोमध्ये रावणाच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी अदित्यनाथ, मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा आणि मुकेश अंबानी यांचे चेहरे लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या भावना दुखावण्याच्या हेतूने हे फोटो व्हायरल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी राजवीर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजवीरच्या या कृत्याने अनेकांच्या भावना दुखावल्याचे कुंदनसिंह यांनी म्हटले आहे. आरोपीविरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याची दखल घेत योग्य कारवाई केल्यास अशा घटनांना आळा बसेल असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या