
सामना प्रतिनिधी, नागपूर
भिवापूर तालुक्यातील नांद येथील प्रशालेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नृत्य करणाऱया विद्यार्थिनींवर नांद पोलीस चौकीचे अंमलदार प्रमोद वाळके यांनी पैसे उधळले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान हे गैरवर्तन करणारे उमरेड पोलीस ठाण्याचे हवालदार प्रमोद वाळके यांच्यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
#WATCH Police constable showers cash on students during Republic Day function at a government school in Nagpur district’s Nand. The police constable was suspended following the incident. (26 January) #Maharashtra pic.twitter.com/nyTZeRCznO
— ANI (@ANI) January 29, 2019
उमरेड पोलीस ठाण्याचे हवालदार अजय चौधरी आणि हवालदार सुनील बनसोडे यांना नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे. याबाबतीत संबंधित कर्मचाऱयांविरुद्ध विभागीय कार्यवाही करण्यात येत आहे. नागपूर जिह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद येथील प्रशालेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थिनी नृत्य करत होत्या. यावेळी वाळकेने नृत्य करणाऱया विद्यार्थिनींवर चक्क पैशांची उधळण केली.































































