
गुन्हा दाखल झाला असून 9 वर्षे फरार असलेल्या आरोपीला मुंबईतील गोरेगावमधून ताब्यात घेण्यात आले. 2014 साली त्या आरोपीवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आरोपी किरण प्रभाकर कारेकर (57, रा. आसुर्डे, खेतलेवाडी, चिपळूण) हा गुन्हा दाखल झाल्यापासून नजरेआड झाला होता. त्याचा सर्वतोपरी शोध घेऊनही तो मागील 9 वर्षांपासून सापडत नव्हता. या आरोपीच्या शोधाकरिता पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. हा आरोपी पोलिसांना मुंबईतील गोरेगाव येथे सापडला. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, योगेश नार्वेकर आणि पोलीस नाईक दत्ता कांबळे यांनी केली.