पोलीस व्हॅन आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक; एक ठार, एक गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परंडा

परंडा येथील बंदोबस्त करून धाराशिवकडे निघालेल्या रॅपीड अॅक्शन फोर्सच्या महीला पोलीस पथकाच्या पोलीस व्हॅन व मोटार सायकलची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना परंडा – बार्शी रोडवर गुरूवारी दुपारी २ च्या सुमारास घडली.

या अपघातात परंडा येथील गणेश हटकर हा ठार झाला तर विशाल झिरपे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बार्शी येथे पाठविण्यात आले आहे. बजाज मोटार सायकलवरून जामगाव, ता. परंडा येथील विशाल झिरपे व गणेश हाटकर हे दोघे परंड्याकडे येत असताना सिना कोळेगाव कॉलनी समोर पोलीस व्हॅनची व मोटार सायकल यांची समोरासमोर धडक झाली होती.