धक्कादायक! बापानेच केला स्वत:च्या 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । रायपूर

छत्तीसगढमध्ये एका नराधम बापाने त्याच्या सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी त्या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्या नराधमाला अटक करण्यात आली. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून वडिलांच्या या नीच कृत्याचा तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.

पीडित मुलगी ही सारंगढ येथे तिची आई व वडिलांसोबत राहायची. मुलीचा बाप हा पोलीस खात्यात कामाला होता.  29 मार्चच्या रात्री ड्युटी संपल्यानंतर तो दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी घरात नव्हती. तीच संधी साधून त्याने मुलीवर बलात्कार केला व त्यानंतर याविषयी कुणालाही सांगितल्यास मारून टाकेन अशी धमकी तिला दिली. मात्र नंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने याविषयी आईला सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या आईने पोलिसांत याबाबत तक्रार केली. याप्रकरणी सारंगढ पोलीसांनी मंगळवारी त्या नराधम बापाला अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.