
नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले वृत्त पूर्णपणे निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच म्हस्के यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय शिवसेनेत कुणीही कुणाची नियुक्ती करू शकत नाही. म्हस्के यांच्या पुनर्नियुक्तीचे वृत्त धादांत खोटे असून म्हस्के हे आता शिवसेनेचे प्राथमिक सदस्यही नाहीत. जनतेने आणि शिवसैनिकांनी अशा खोटय़ा वृत्तावर विश्वास ठेवू नये, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.






























































