कसबा पेठ-चिंचवडमध्ये 26 फेब्रुवारीला मतदान, पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात अंशतः बदल केला आहे. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी आता 27 फेब्रुवारी ऐवजी रविवार, 26 फेब्रुवारी 2023 रोजी मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने आज दिली. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या इयत्ता बारावी तसेच पदवीच्या परीक्षा लक्षात घेऊन पेंद्रीय निवडणूक आयोगाने हा बदल केला आहे, मात्र पोटनिवडणुकीच्या उर्वरित कार्यक्रमात कोणताही बदल केलेला नाही. निवडणूक आयोगाने 18 जानेवारीला कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यानुसार या पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते, मात्र ज्या मतदान पेंद्रांवर मतदान होणार आहे तेथे बारावी आणि पदवीच्या परीक्षा होणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी आयोगाच्या निदर्शनास आणले. या पार्श्वभूमीवर आयोगाने मतदानाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला.