मुलीच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्ट फोन नाही घेता आला म्हणून गरीब शेतकर्‍याची आत्महत्या

1067

त्रिपुरामध्ये एका शेतकर्‍याला आपल्या मुलीसाठी ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन नाही घेता आला. म्हणून या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे.

कोरोना संकटकाळात शाळा कॉलेज बंद आहे. शाळा कॉलेज प्रशासनाने ऑनलाईन वर्गांवर भर द्यावा असे निर्देश सरकारने दिले आहेत. त्रिपुरामध्ये एका 10 वीच्या विद्यार्थिनीला ऑनलाईन वर्गासाठी स्मार्ट फोन हवा होता. पण तिचे वडील गरीब शेतकरी होते. त्यांना स्मार्टफोन परवडणार नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या मुलीला साधा फोन घेऊन दिला. पण हा फोन काही कामाचा नाही अशी तक्रार मुलीने केली. दोघांमध्ये वाद झाला आणि मुलीने तो फोन तोडून दिला. याचे वडिलांना खूप दुःख झाले आणि आपल्या खोलीत निघून गेले. सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या