आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांसाठी पदवी शिक्षणानंतर रोजगार संधी!

applyboard

वाढत्‍या इंटरकनेक्‍टेड विश्‍वामध्‍ये आंतरराष्‍ट्रीय शिक्षण विविध देशांच्‍या संस्‍कृतींना एकत्र आणत आले, देशांमधील समज व सहकार्य वाढवत आहे. विविध पार्श्‍वभूमी व दृष्टिकोन असलेले आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थी दर्जेदार शिक्षण मिळवण्‍यासह आपल्‍या स्‍वत:च्‍या देशाच्‍या आर्थिक व सांस्‍कृतिक विकासाप्रती योगदान देत आहेत. आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांच्‍या ऍक्टिविटीमध्‍ये वाढ होण्‍यासह प्रमुख गंतव्‍य बाजारपेठा आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांना राहण्‍यासह पदवी शिक्षणानंतर काम करण्‍यामध्‍ये सर्वोत्तमरित्‍या मदत करण्‍यासाठी त्‍यांच्‍या धोरणांचे पुनर्मूल्‍यांकन करत आहेत आणि मोठ्या परिवर्तनांची अंमलबजावणी करत आहेत. सरकारने प्रमुख धोरणांची पुन्‍हा आखणी केली आहे, तर संस्‍थांनी प्रतिभावान विद्यार्थ्‍यांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी नाविन्‍यपूर्ण विपणन धोरणंचा अवलंब केला आहे.

या लेखामध्‍ये अप्‍लायबोर्ड येथील चीफ एक्‍स्‍पेरिअन्‍स ऑफिसर करूण कंदोई तीन प्रमुख गंतव्‍य बाजारपेठांमध्‍ये विद्यार्थ्‍यांसाठी उपलब्‍ध असलेल्‍या पदवी शिक्षणानंतर रोजगार संधींबाबत सांगत आहेत.

ऑस्‍ट्रेलिया

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख गंतव्यस्थान असलेल्‍या ऑस्ट्रेलियाने आपली प्रतिष्ठा दृढपणे कायम ठेवली आहे. 2021 मध्ये, ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री यांनी एका महत्त्वपूर्ण विकासाचे अनावरण केले, ते म्‍हणजे शिक्षणानंतर कामाच्या अधिकारांचा विस्तार. यामुळे पात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीधरांना त्यांचा ऑस्ट्रेलियातील मुक्काम आणि नोकरी आणखी दोन वर्षांनी वाढवता येते. विशेष म्हणजे, हा विस्तार प्रामुख्याने कुशल व्यावसायिकांची कमतरता अनुभवणाऱ्या क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्‍यांवर लक्ष्य करतो.

मान्यताप्राप्त ऑस्ट्रेलियन शिक्षण

प्रदात्यांकडून पात्र पदवी असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सरकारने आता औपचारिकपणे दोन वर्षांचा ऑस्ट्रेलियन पदव्युत्तर कार्य विस्तार सुरू केला आहे. 1 जुलै 2023 पासून आरोग्‍यसेवा, अध्यापन, अभियांत्रिकी आणि इतर अनेक विषयांमधील पदवीधर आता त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये वास्‍तव्‍य करण्‍यासह काम करू शकतात. तसेच सध्‍याच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी कामकाज तास 40 तासांवरून अधिक अनुकूल 48-तासांपर्यंत करण्‍यात आल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांचे अधिक लक्ष वेधून घेण्‍यात येत आहे.

कामाच्या अधिकारातील या सुधारणांमुळे विद्यार्थी आणि पात्र पदवीधरांना लाभदायी वास्‍तविक परिवर्तनाची खात्री मिळू शकते. तसेच ऑस्‍ट्रेलियामध्‍ये शिक्षण घेण्‍याची इच्‍छा असणाऱ्या विद्यार्थ्‍यांसाठी या अविश्‍वसनीय संधींचा फायदा घेण्‍याकरिता ही योग्‍य वेळ आहे.

युनायटेड किंग्‍डम

युनायटेड किंग्‍डमने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदवीनंतर यशस्वी होण्यासाठी सुस्पष्ट मार्ग उपलब्‍ध असण्‍याच्‍या खात्रीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यूकेचा ग्रॅज्‍युएट रूट आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना यूकेमध्ये राहण्याची आणि त्यांच्या शिक्षणानंतर रोजगाराच्या संधी शोधण्‍याची सुविधा देतो. पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेले पदवीधर यूकेमध्ये दोन वर्षांपर्यंत राहण्यासाठी अर्ज करू शकतात, तर पीएचडी पदवीधारक त्यांचा मुक्काम तीन वर्षांपर्यंत वाढवण्यास पात्र आहेत.

ग्रॅज्युएट व्हिसाची मुदत संपल्यानंतर पात्रताधारक पदवीधर दुसरा लक्षवेधक पर्याय:

स्किल्‍ड वर्कर व्हिसाकडे ट्रान्‍सफर होऊ शकतात. हा व्हिसा व्यक्तींना यूकेमध्ये राहण्याची परवानगी देतो, त्‍यासाठी त्यांच्याकडे मान्यताप्राप्त नियोक्ता व नोकरीची पात्रता असण्‍याची गरज आहे.

पदवी शिक्षणानंतर वास्‍तव्‍य व रोजगाराची संधी देणारे हे मार्ग विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या पसंतीचे शिक्षण गंतव्‍य म्‍हणून यूकेची निवड करण्‍यास प्रेरित करतात, तसेच देशाची जागतिक टॅलेंट हब म्‍हणून प्रतिष्‍ठा अधिक दृढ देखील करतात.

युनायटेड स्‍टेट्स

आंतरराष्‍ट्रीय विद्यार्थ्‍यांसाठी जगातील सर्वात लोकप्रिय गंतव्‍य असलेले युनायटेड स्‍टेट्स आपले स्‍पर्धात्‍मक अग्रणी स्‍थान अधिक वाढवण्‍यासाठी सक्रियपणे काम करत आहे. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग (ओपीटी) प्रोग्राम पुन्हा सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक कामाचा अनुभव मिळेल.

तसेच, अनेक एसटीईएम पदवीधरांना विस्तारित ओपीटी कालावधीचा फायदा होतो, ज्‍याचे श्रेय युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारने त्‍यांच्‍या एसटीईएम ओपीटी एक्‍स्‍टेन्‍शन यादीमध्‍ये भर केलेल्‍या अभ्‍यासाच्‍या आठ नवीन क्षेत्रांना जाते. एसटीईएम प्रोग्रामचे शिक्षण घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना या विकासाचे महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. या अपडेटसह पात्र प्रोग्राम्‍सच्‍या विस्तृत श्रेणीतील अलीकडील पदवीधर त्यांच्या ऑप्‍शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगकरिता 24 महिन्यांच्या विस्तारासाठी अर्ज करू शकतात, ज्यामुळे त्यांना युनायटेड स्टेट्समधील त्यांच्या कामाचा अनुभव इतर क्षेत्रातील पदवीधरांच्या तुलनेत प्रभावीपणे तिप्पट करता येईल. ओपीटीमधील हा विस्तारित कालावधी विद्यार्थ्यांना त्यांची विशेष कौशल्ये अधिक निपुण करण्‍यास, भावी करिअरमध्‍ये यशस्‍वी ठरण्‍यासाठी स्वत:ची स्थिती अधिक उत्तम करण्‍यास साह्य करतो.