आयपीएलमध्ये येणार ‘पॉवर प्लेयर’ नियम; सामन्यात कधीही खेळाडू बदलता येणार

462

क्रिकेट विश्वात सर्वात लोकप्रिय आणि लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या इंडियन प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार आणखी वाढविण्यासाठी पॉवर प्लेयरहा नवा नियम येणार आहे. ‘आयपीएलच्या आगामी पर्वात हा नियम लागू करण्यासाठी बीसीसीआयने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

क्रिकेटचा थरार वाढणार

पॉवर प्लेयरया नव्या नियमाबद्दल बोलताना संबंधित अधिकारी म्हणाले, या नियमाने एखाद्या सामन्याचा निकाल बदलू शकतो. याचबरोबर उभय संघांना केगळा किचार करण्यास किंका केगळी रणनीती आखण्यास प्रोत्साहन मिळेल. क्रिकेटमधील थरार वाढविणे हाच या नव्या नियमामागील उद्देश आहे.

अंतिम 11 ऐवजी 15 खेळाडू निवडण्याची योजना

पॉवर प्लेयरच्या नक्या नियमानुसार एखादा संघ सामन्यादरम्यान खेळाडू बाद झाला किंका षटक संपल्यानंतर खेळाडू बदलू शकतो. हा नकीन नियम लागू करण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती बीसीसीआयच्या एका करिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र मंगळकारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात होणाऱ्या आयपीएल प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तपणे चर्चा करण्यात येणार आहे. संघांना अंतिम 11 ऐकजी 15 खेळाडूंची निकड करता येईल आणि सामन्यादरम्यान खेळाडू बाद झाला किंका षटक संपल्यानंतर एका खेळाडूला कधीही बदलता येणार आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हा नियम लागू करणे योग्य असेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या