वीज दरवाढ हे सरकारचे तिसरे गिफ्ट, सुप्रिया सुळे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅस तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्दय़ावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱयांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात नवे सरकार स्थानापन्न होताच जनतेला वीज दरवाढीला सामोरे जावे लागत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीज दरवाढीचे लगोलग तिसरे गिफ्ट देऊन टाकले आहे. यापूर्वी गॅस दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. दुग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी या दोन गिफ्ट या सरकारने आधीच दिल्या होत्या. आता वीज दरवाढीचे हे तिसरे गिफ्टदेखील जनतेला देण्यात आले आहे, असे सुप्रिया सुळे ट्विटरद्वारे म्हणाल्या आहेत.

तसेच ही वीज दरवाढ निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, असेदेखील सुप्रिया सुळे ट्विटद्वारे एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या आहेत.