
प्रभादेवी खेडगल्ली येथील श्री साईनाथ उत्सव मंडळाच्यावतीने 15 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत साई उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंडळाचे यंदाचे 52 वे वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख- आमदार सदा सरवणकर, नगरसेवक समाधान सरवणकर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कमलेश चव्हाण यांनी सांगितले.


























































