‘साहो’मध्ये प्रभासचे हिंदी डायलॉग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या बहुचर्चित सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनानंतर चाहत्यांना आता ट्रेलरची प्रतीक्षा आहे. ‘साहो’ चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामीळ, तेलगू आणि मल्याळम. हे सिनेमा डबिंगचे नसतील. प्रभासच त्या त्या भाषेतील डायलॉग म्हणणार आहे. त्यामुळे प्रभास पहिल्यांदाच पडद्यावर हिंदी बोलताना दिसेल. ‘साहो’च्या निमित्ताने प्रेक्षकांना लाडक्या प्रभासला भेटण्याची संधी मिळणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर प्रभास पाच शहरांचे दौरे करणार आहे. मुंबई, चेन्नई, कोची, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांत जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे आणि सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करणार आहे. ‘साहो’ हा अ‍ॅक्शनपट आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय यांच्या भूमिका आहेत.