
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीचे विद्यार्थी नेते प्रभात गुप्ता यांच्या हत्येप्रकरणातील अंतिम सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
जुलै 2000 मध्ये लखीमपूरच्या तिकुनियामध्ये प्रभात गुप्ता यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी प्रभात यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजय मिश्रा टेनी, शशी भूषण, राकेश डालू आणि सुभाष मामा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. 2004 मध्ये लखमपूर न्यायालयाने अजय मिश्रा यांना दोषमुक्त केले होते. या निकालाविरोधात प्रभात यांच्या कुटुंबीयांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपिल केले होते.
मात्र, त्यावरील सुनावणीपूर्वी टेनी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठाकडे ट्रान्सफर करण्याचे अपिल केले होते. त्यांची ही याचिका सरन्यायाधीशांनी 2022 मध्ये फेटाळली होती. त्यानंतर टेनी यांनी केस ट्रान्सफर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळात मिश्रा टेनी यांना दणका दिला आणि याचिका पुन्हा अलाहाबाद न्यायालयाकडे वर्ग केली होती.
9 नोव्हेंबर 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आली होती, तेव्हा देखील निर्णय राखून ठेवण्यात आला होता. मात्र, न्यायमप्रती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती रेणु अग्रवाल यांच्या खंडपीठाला अद्याप काही मुद्द्यांवरील चर्चेसाठी ही सुनावणी सुरू ठेवणं गरजेचं वाटलं. त्यानंतर या पीठासमोर सुनावणी सुरू राहिली. अखेर मंगळवारी या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण करण्यात आली असून लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे.



























































