अजित पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, मोदींच्या डोक्यावर जिरेटोप ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. मोदींसोबत अर्ज भरताना महाराष्ट्रातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी अजित पवार गटाकडून चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घालण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अजित पवार गटाच्या या कृ़तीवर सध्या समाजमाध्यमावर संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील अजित पवार गटाच्या या कृतीवर सडकून टीका केली आहे. ”जिरेटोप हा तात देऊन एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो, परंतु अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांनी महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असणारा जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर परिधान करून महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचं काम या नेत्यांकडून होतंय. महाराजांचा अवमान करणा-या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली आहे.