देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकर यांची टीका

2802

देशातील विरोधी पक्ष संपवण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. ही कृती देशात हुकूमशाही निर्माण करण्याची आहे. अशी टीका  वंचित विकास आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या सभेत बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

लातूर येथील टाऊन हॉलच्या मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. अण्णाराव पाटील, संतोष सुर्यवंशी, यशपाल भिंगे, राजा मणियार, विष्णू जाधव यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की देशातील विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवण्याचा चंग भाजपाने २०१४ पासून बांधला आहे. त्यांची ही कृती देशात हुकूमशाही निर्माण करण्याची आहे. भाजपा जाणिवपुर्वक देशाता मंदी ओढवून घेत आहे. मंदीमुळे अनेक उद्योग बंद पडत आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. भाजपाचेच दुसरे नाव मंदी आहे. जो पर्यंत देशात भाजप सरकार आहे तो पर्यंत देशात मंदी राहणार असेही अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या