यापुढे निवडणूक लढवणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची घोषणा

2369

जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन विधानसभा निवडणुकीत मला विजयी केली. माझी शेवटची निवडणूक असल्याने जनतेने मला निवडून दिले त्या जनतेचा विश्वास आपण सार्थ ठरवणार असून यापुढे निवडणूक लढवणार नाही असा पुनरुच्चार आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. निवडणूक लढणार नसलो तरी समाजकार्यात झोकून देणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत सोळंके विरोधकांकडून ‘सोळंके यांचे वय झाले’ अशी सतत टीका करण्यात येत होती. त्यावेळी प्रकाश सोळंके यांनी ‘आपली ही शेवटची निवडणूक आहे’ असे म्हणून ते जनतेला सामोरे गेले होते व जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून विजयी केले. यानंतर जनतेचा विश्वास आपण सार्थ ठरवणार असून यापुढे निवडणूक लढवणार नाही असा पुनरुच्चार आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या