प्रार्थनाने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेत कलाकार आवर्जून आपले आवडते छंद जोपासताना दिसतायत. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरचं काही’ आदी चित्रपटांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या आपल्या कुटूंबियांसह निवांत वेळ घालवत आहे. यासोबत ती आपल्या आवडीनिवडी देखील जपतेय. बाप्पाच्या आगमनाला जेमतेम 18 दिवस शिल्लक राहिल्याने प्रार्थनाने मोकळ्या वेळेत घरच्या घरीच बाप्पाची ईकोफ्रेंडली मूर्ती साकारली आहे. बाप्पाचे काही फोटो तिने सोशल मिडीयावर देखील शेयर केले आहे. सोबतच हा आपला पहिलाच प्रयत्न असून आपल्याला मार्गदर्शन करणार्या सीमा प्रधान यांचे देखील तिने आभार मानले आहेत.