बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर रणनिती बनवणे सोडेन – प्रशांत किशोर

prashant-kishore

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलसाठी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे रणनिती आखत आहेत. प्रशांत किशोर यांनी या निवडणूकीत भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजयकीय रणनिती करणे सोडून देईन असे सांगितले आहे.

इंडिया टुडेला प्रशांत किशोर यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळणार असल्याचा दावा केला आहे. ‘तृणमूल सध्या एका अशा पक्षाशी लढतेय जो एका निवडणूकीच्या मशीनसारखा काम करतोय. पण तृणमूल देखील बरेच वर्ष सत्तेत आहे. तृणमूलकडेही एक जबरदस्त चेहरा आहे. काही ठिकाणी विरोधही होतोय पण तरिही तृणमूलचाच विजय होणार हे नक्की. भाजप 200 जागांचा दावा करतेय पण भाजपला 100 हून अधिक जागा मिलाल्या तर मी राजकीय राजनिति करणं सोडून देईन’, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

भाजप समोरच्या पक्षात फूट घातले

‘भाजपच्या रणनितीचा मोठा भाग म्हणजे समोरच्या पक्षात फूट पाड़णे. तृणमूल काँग्रेस या पक्षाची मूळंच मुळात घट्ट नाहीत. त्याच रणनितीवर भाजप काम करतेय. काहिंना पैसे दिले जात आहेत. काहिंना सुरक्षा पुरवली जातेय. पण हे आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. आतापर्यंत जेवढी सर्वेक्षणं आली सगळ्यात भाजपचा पराभवच दाखवलेला आहे.

भाजप त्यांची हवा तयार करतेय

अमित शहा पश्चिम बंगालमध्ये येऊन दावा करतात की भाजप 200 जागा जिंकणार. ते एक माहोल तयार करत आहेत जेणेकरून तृणमूल काँग्रेसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल. भाजप फक्त हवा तयार करतेय. भाजपने 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या ना तर मी राजकीय रणनिती करणे सोडून देईन.

आपली प्रतिक्रिया द्या