आईचं नाव हृदयावर कोरलं! स्मिता पाटील यांच्या आठवणीत प्रतीकने काढला टॅटू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा, अभिनेता प्रतीक बब्बर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आईच्या आठवणीत प्रतीकने नुकताच ‘स्मिता’ असं लिहिलेला टॅटू छातीवर गोंदवला आहे.
या टॅटूच्या खालच्या बाजूला ‘1955-इंफिनिटी’ असे लिहिलेलं आहे. स्मिता पाटील यांचा जन्म 1955 साली झाला होता. टॅटूचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर करत ‘आईचं नाव हृदयावर कोरलंय’ अशा आशयाची कॅप्शन प्रतीकने दिली आहे. ‘‘आईच्या नावाचे टॅटू मला काढण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. अखेर आता ही इच्छा पूर्ण झाली आहे. आईचे नाव जिथे असायला पाहिजे तिथेच लिहिले आहे. कायम ती माझ्या हृदयाजवळ असेल,’’ असे प्रतीक म्हणाला.