शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा- प्रथमेश दिवेकर विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करुलकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 15 वर्षांखालील शालेय मुलामुलींच्या ऑनलाइन विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धेत कल्याण येथील के. सी. गांधी स्कूलच्या प्रथमेश दिवेकरने विजेतेपद पटकावले. मुंबई शहर बुद्धिबळ संघटना,  इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलन्स व आयडियल स्पोर्ट्स अॅकॅडमी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या स्पर्धेत इंटरनॅशनल फिडे गुणांकित बुद्धिबळपटू प्रथमेश दिवेकरने सर्वाधिक साखळी 6.5 गुण नोंदवीत निर्विवाद वर्चस्व राखले.

स्विस लीग पद्धतीने लिचेस प्लॅटफॉर्मवर साखळी 7 फेऱयांमधील ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे अंतिम उपविजेतेपद अंबरनाथ येथील इन्फंट जेसूस स्कूलच्या विभा नवरेने साखळी 5.5 गुणांसह पटकावले. प्रशांत यादवने (5 गुण) तृतीय, शुभमने (5 गुण) चौथा, प्रजत गजंगीने (4.5 गुण) पाचवा, संजय प्रज्ञेशने (4.5 गुण) सहावा, वेदनाथ देवकरने (4 गुण) सातवा तर भूमिघा पिल्लईने (4 गुण) आठवा क्रमांक मिळवला. विजेत्या-उपविजेत्यांचे मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजंगी व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर चव्हाण यांनी अभिनंदन केले.