आयफोनची उद्यापासून प्री ऑर्डर, 19 सप्टेंबरला पहिला सेल

अ‍ॅपल कंपनीने आपली बहुचर्चित न्यू सीरिज आयफोन 17 अखेर लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने आयफोन 17, आयफोन एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स हे चार आयफोन लाँच केले आहेत. आयफोनची किंमत पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा अधिक आहे. या फोनची प्री ऑर्डर उद्या, 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर या फोनचा पहिला सेल 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयफोन 17 एक बेस मॉडल आहे. आयफोनने अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 3 लाँच केली असून याची किंमत 89,900 रुपये, तर एअरपॉड्स प्रो 3 ची किंमत 25 हजार 900 रुपये आहे. कंपनीने अ‍ॅपल वॉच सीरिज 11 लाही आणले असून याची सुरुवातीची किंमत 46 हजार 900 रुपये ठेवली आहे.

आयफोन 17

256 जीबी – 82,900 रुपये
512 जीबी – 1,02,900

आयफोन 17 एअर

256 जीबी – 1,19,900
512 जीबी – 1,39,900
1 टीबी – 1,59,999

आयफोन 17 प्रो

256 जीबी – 1,34,900
512 जीबी – 1,54,900
1 टीबी – 1,74,900

आयफोन प्रो मॅक्स

256 जीबी – 1,49,900
512 जीबी – 1,69,900
1 टीबी – 1,89,900
2 टीबी – 2,29,900

एअरपॉड्स प्रो 3

25,900 रुपये

अ‍ॅपल वॉच सीरिज 11

42 एमएम – 46,900
46 एमएम – 49,900

अ‍ॅपल वॉच2 अल्ट्रा 3

89,900 रुपये