प्रीती झिंटाचा आठ वर्षांनी कमबॅक..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा सनी देओलच्या ‘लाहोर 1947’ मुळे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ती यावर्षी आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. तिच्या पुढच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. प्रीती झिंटा 8 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ती आमिर खानच्या निर्मिती असलेल्या ‘लाहोर 1947 ‘ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रीतीसोबत सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. प्रीतीने आधीच आणखी एका चित्रपटाची तयारी केली आहे. ‘लाहोर 1947 ‘ मधून पुनरागमन केल्यानंतर, तिचा पुढच्या महिन्यात आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘व्हाइब’ आहे.

‘व्हाइब’ हा कुणाल खेमू दिग्दर्शित एक विनोदी चित्रपट आहे. कुणालनेच चित्रपटाची कथा लिहिली असून तो मुख्य भूमिकेतही आहे. ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात कुणालसोबत प्रीती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपटाबद्दल अद्याप जास्त माहिती समोर आलेली नसली तरी, निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रीतीने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

पोस्टरमध्ये कोणतेही चेहरे दिसत नसले तरी, चित्रपटात दिसणाऱ्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. कुणाल खेमू आणि प्रिती झिंटा यांच्यासोबत वंशिका धीर आणि स्पर्श श्रीवास्तव हे देखील चित्रपटात दिसणार आहेत. कुणाल हा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक असण्यासोबतच या चित्रपटात निर्माता म्हणूनही सहभागी आहे. ‘लाहोर 1947’ नंतर एक महिना आणि पाच दिवसांनी, हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना प्रिती झिंटाने कॅप्शनमध्ये लिहिले, “‘व्हाइब’मध्ये पंच आणि पंचलाइन दोन्हीची हमी आहे.” प्रिती झिंटा शेवटची 2018 च्या ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटात दिसली होती. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओलनेही काम केले होते. अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, अमिशा पटेल आणि जयदीप अहलावत यांसारख्या कलाकारांनीही या चित्रपटात काम केले होते. ‘भैयाजी सुपरहिट’नंतर, प्रिती आता तिच्या पुनरागमनाच्या चित्रपटात सनी देओलसोबत दिसणार आहे.