‘राफेल’मुळे देशाची संरक्षणक्षमता वाढेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या सुरक्षाविषयक गरजांबाबत तडजोड करणे वर्तमानकाळात आणि भविष्यकाळातही हिताचे ठरणार नाही असे सांगतानच ‘राफेल’ लढाऊ विमानांमुळे आपली संरक्षणाची क्षमता वाढेल, असा दावा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण करताना ते बोलत होते. राफेल लढाऊ विमाने ही हिंदुस्थानच्या संरक्षण व्यवस्थेत ‘गेमचेंजर’ ठरतील, असा संरक्षणविषयक विश्लेषकांचा होरा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्या जवानांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी सीमेपार जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे हिंदुस्थानची नवी धोरणे आणि रणनीतीची प्रचीती जगाला आली, असेही राष्ट्रपतींनी सांगितले. माझ्या सरकारने नव्या हिंदुस्थानचा संकल्प केला आहे, असेही त्यांनी सांगितले.