
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेत बोलताना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट “भ्रष्ट” म्हणत जोरदार टीका केली. दिल्लीच्या जंतर-मंतर येथे पक्षकार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आजपासून भाजपच्या काउंटडाउन सुरू झाला आहे, असे म्हणाले.
“मित्रांनो, ही तीच जंतर-मंतर आहे जिथून लोकांनी काँग्रेसपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजची तारीख नोंद करून ठेवा—आजपासून भाजपच्या (पडझडीचा) काउंटडाउन सुरू झाला,” असे ते म्हणाले.
मोदी जी कहते रहे “केजरीवाल भ्रष्ट है” .. लेकिन कोर्ट ने साफ़ कर दिया, एक भी सबूत नहीं है।
अगर इनको सच में भ्रष्टाचार खत्म करना है तो गुजरात में अवैध शराब, जमीन सौदों और गिरते पुलों पर कार्रवाई करके दिखाइए।
ये लोग वहाँ कार्रवाई नहीं करते जहाँ इनके अपने लोग शामिल हों।
अब देश… pic.twitter.com/xIRfYKACi2
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 1, 2026
केजरीवाल म्हणाले, “मोदीजी कारवाई करणार नाहीत, कारण भ्रष्टाचारात स्वतः मोदीजी किंवा त्यांच्या पक्षातील सदस्य किंवा त्यांचे मित्र गुंतलेले आहेत. मी भ्रष्ट नाही; भ्रष्टाचार मोदीजी करत आहेत.” त्यांनी पुढे आव्हान देत म्हटले की, “दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून मी 10 वर्षे काम केले. माझ्याविरोधात किती चौकशा लावल्या, पण एक पैश्याचांही भ्रष्टाचार सापडला नाही. जर दिल्ली सरकारचा एखादा कंत्राटदार किंवा विक्रेता उभा राहून ‘केजरीवालांनी माझ्याकडे पैसे मागितले’ असे म्हणाला, तर मी राजकारण सोडेन.”
27 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष न्यायालयाने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 21 जणांना दारू धोरण प्रकरणात निर्दोष मुक्त केले. या निकालाबद्दल केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे अभिनंदन केले. “गेल्या चार वर्षांत मोदीजी आणि अमित शहांनी कट रचून दिल्लीकरांना खूप त्रास दिला. न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटले की पुरावा नाही; संपूर्ण प्रकरण बनावट आहे,” असा त्यांचा आरोप होता.
केंद्रातील भाजप सरकारवर हल्ला चढवताना ते म्हणाले, “30 वर्षांनंतर पूर्ण बहुमताने लोकांनी मोदीजींचे सरकार मोठ्या अपेक्षेने निवडले. पण 12 वर्षांत बँका, रेल्वे, शिक्षण, रुग्णालये, गावे—प्रत्येक क्षेत्राचे नुकसान झाले. उत्तर हिंदुस्थानात श्वास घेणे कठीण झाले आहे; वायुप्रदूषणाचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. विकसित हिंदुस्थानाची गोष्ट सोडा, किमान राहण्यायोग्य हिंदुस्थान तरी बनवा” असेही केजरीवाल म्हणाले.
या प्रकरणात केजरीवाल यांनी 5 महिने तुरुंगवास भोगला होता, तर सिसोदिया 17 महिने कारावासात होते. सप्टेंबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच बहुमत गमवावे लागले.
























































