
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 66 टक्क्यांवरून थेट 24 टक्के इतकी झाली आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. या सर्वेक्षणात लोकांना प्रश्न विचारण्यात आला होता की पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती कोण ? ऑगस्ट 2020 मध्ये या प्रश्नाचं उत्तर 66 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी असं दिलं होतं. जानेवारी 2021 मध्ये हे प्रमाण घटून 38 टक्के झालं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये हे प्रमाण आणखी घटलं असून ते 24 टक्के झालं आहे.
एकीकडे भाजपचे प्रमुख नेते असलेल्या नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली असली तरी भाजपच्याच दोन नेत्यांची प्रसिद्धी वाढल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऑगस्ट 2021 मधील सर्वेक्षणात 11 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी लायक व्यक्ती म्हणून पसंती दर्शवली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये फक्त 3 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ताज्या सर्वेक्षणात 7 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये फक्त 4 टक्के लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली होती.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची लोकप्रियता काही प्रमाणात वाढल्याचं या सर्वेक्षणात दिसून आलं आहे. ऑगस्ट 2020 मघ्ये राहुल यांना 8 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार म्हटलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये हे प्रमाण 10 टक्के झालं आहे. 2020 च्या तुलनेत केजरीवाल यांची लोकप्रियता वाढली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 8 टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधान पदासाठी लायक उमेदवार म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ऑगस्ट 2020 मध्ये फक्त 2 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी लायक उमेदवार म्हटलं होतं. ऑगस्ट 2021 मध्ये हे प्रमाण 8 टक्के इतकं झालं आहे.
Mood of the Nation August 2021 हे सर्वेक्षण 10 जुलै से 20 जुलै दरम्यान घेण्यात आलं होतं. कार्वी इनसाइटने (Karvy Insights) हे सर्वेक्षण केलं होतं. द्वारा किया गया था। देशाच्या 19 भागांत, 115 लोकसभा क्षेत्रांमध्ये आणि 230 विधानसभा क्षेत्रांमध्ये करण्यात आलं होतं.





























































