पृथ्वी शॉ वि. उत्तर प्रदेश! विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय हजारे ट्रॉफीमधला अंतिम फेरीचा सामना उद्या रंगणार आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यामध्ये जेतेपदाच्या लढतीचा धमाका तमाम क्रिकेटप्रेमींनी यावेळी पाहायला मिळेल. पण हा सामना पृथ्वी शॉ आणि उत्तर प्रदेश असाच असणार आहे. युवा कर्णधार पृथ्वी शॉ याने स्वबळावर मुंबईला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. उद्याही त्याच्याकडून याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा बाळगली जात आहे. मुंबईचा संघ यावेळी या स्पर्धेच्या चौथ्या जेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.

वन डे मालिकेसाठी संधी

पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंत चार शतकांसह सर्वाधिक 754 धावा फटकावल्या आहेत. उत्तर प्रदेशचे गोलंदाज उद्याच्या लढतीत पृथ्वी शॉला टार्गेट करणार हे निश्चित आहे. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी माघार घेऊन विश्रांती घेतल्यास सलामीवीरासाठी पृथ्वी शॉसाठी टीम इंडियाचे दरवाजे पुन्हा एकदा खुले होऊ शकतील.

उत्तर प्रदेशचे लक्ष्य दुसऱया अजिंक्यपदाचे

उत्तर प्रदेशने विजय हजारे स्पर्धेचे एक वेळा जेतेपद पटकावले आहे. 2004-05 या सालामध्ये तामीळनाडू व उत्तर प्रदेश हे संयुक्तरीत्या या स्पर्धेचे चॅम्पियन ठरले होते. त्यानंतर 2005-06 सालामध्ये रेल्वेकडून उत्तर प्रदेशला अंतिम फेरीत हार सहन करावी लागली होती. आता उत्तर प्रदेशला दुसऱयांदा या स्पर्धेचे जेतेपदाची आस लागलीय.