खासगी बस चालकांना प्रवासी वाहतुकीची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्यातील एसटी चालकांचा संप सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने खासगी बस चालकांना ‘प्रवासी वाहतूक’ करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

27 ऑक्टोबरच्या रात्रीपासून राज्यातील एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे राज्यातील अनेक आगारामध्ये काम बंद झाले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या चाकरमान्यांचे परतीसाठी हाल सुरू आहेत. त्यामुळे संपकाळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोटार वाहन अधिनियम 1988 (1988 चा 59 ) चे कलम 66 चे उपकलम 3 चा खंड (एन) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करीत सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, पंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. 8 नोव्हेंबरपासून संप मागे घेतले जाईल त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी असेही गृहविभाग (परिवहन)यांनी म्हटले आहे.