अपघातानंतर संतप्त जमावाने लक्झरी पेटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

भरधाव लक्झरीने दिलेल्या धडकेत एक युवक ठार झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने बस जाळल्याची घटना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास भंडारा जिह्यातील लाखंदूरजवळ घडली.

नागपूरवरून अर्जुनी-मोरच्या दिशेने बाबाश्रीची लक्झरी बस जात होती. त्यावेळी बाजार समितीच्या परिसराजवळ या बसने रमेश बाळकृष्ण पिलारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी बस पेटवून दिली व चालकाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी पोलिसांकडे लावून धरली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने लाखंदूर, पवनी, दिघोरी येथून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली.