प्रवेशपूर्व नोंदणीला अल्प प्रतिसाद, खासगी आयटीआयच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांना रोजगार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱया आयटीआय अभ्यासक्रमांना यंदादेखील अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे खासगी आयटीआय संस्थाचालक चिंतेत पडले असून यंदादेखील निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती त्यांना सतावत आहे. आयटीआय प्रवेशासाठी प्रवेशपूर्व नोंदणी करण्याची मुदत 31 ऑगस्टला संपणार असून आतापर्यंत 1 लाख 99 हजार 39 विद्यार्थ्यांनीच अर्ज कन्फर्म केले आहेत.

आयटीआय प्रवेश प्रक्रियेचा कालावधी जास्त असल्याचा परिणाम प्रवेशावर होत असल्याचे मत काही आयटीआय शिक्षकांनी व्यक्त केले. 15 जुलैपासून सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया 7 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 21 दिवसांनंतर आयटीआय प्रवेश होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱया या अभ्यासक्रमाविषयीची जाहिरात अपुरी पडत असल्याचेही मत अनेकांनी व्यक्त केले. आयटीआयच्या राज्यभरात सुमारे दीड लाख जागा उपलब्ध असून अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या ही दोन लाखांवर असली तरी अर्ज करणारे सर्वच विद्यार्थी आयटीआयला प्रवेश घेतात असे नाही. यातील अनेक विद्यार्थी अकरावी तसेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाकडेदेखील वळतात.

येईल त्याला प्रवेश देण्याची मुभा द्या

प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य देण्याची मागणी खासगी आयटीआय संस्थाचालकांनी केली आहे. अन्यथा या संस्था बंद कराव्या लागतील अशी भीती संस्थाचालक व्यक्त करीत आहेत. गेल्या कर्षी प्रकेशअर्ज जास्त येऊनही खासगी संस्थामधील 40 ते 50 टक्के जागा या रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे येईल त्याला प्रवेश देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्मेंट आयटीआय महाराष्ट्रचे सचिव देवेंद्र पाटणे यांनी केली आहे.

ते 1 लाख 34 हजार विद्यार्थी गेले कुठे?

आयटीआय प्रवेशासाठी आतापर्यंत 3 लाख 32 हजार 218 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यातील 1 लाख 99 हजार 39 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कन्फर्म केले आहेत. त्यामुळे यापैकी उर्वरित 1 लाख 33 हजार 179 विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न उभा राहिला आहे. विद्यार्थी सायबर कॅफेमधून, मोबाईल ऍपद्वारे प्रवेश अर्ज भरत आहेत. अनेकांना प्रवेशपूर्व नोंदणी केल्यानंतर पुढील प्रक्रिया ठाऊक नसल्याने निदर्शनास आले आहे. अनेक जण ऑप्लिकेशन कन्फर्मेशन फॉर्म, ऑप्शन फॉर्म भरणे या टप्प्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाद होतात.

आयटीआयमधील कौशल्यावर आधारित कोर्सेसना विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. दहावीत 90 टक्के गुण मिळविणारे अनेक विद्यार्थीही रोजगाराची संधी ओळखून आयटीआयला पसंती देत आहेत. प्रवेशपूर्व नोंदणीला अजून 10 ते 12 दिवस शिल्लक असून नोंदणी करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच वाढेल. गेल्या वर्षीदेखील कोरोनाच्या परिस्थितीत जागांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आयटीआयचे प्रवेश ऑनलाइनच होणार असून खासगी संस्थांना मॅनेजमेंट कोटय़ाद्वारे त्यांच्याकडील जागा भरण्याचे स्वातंत्र आहे.
z दिगंबर दळवी, संचालक,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय