
मराठी अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट सध्या चर्चेत आले आहेत. या दोघांनी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. उमेश आणि प्रिया दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवर या नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहे. चाहते त्यांचा नवीन लूक पाहून थक्क झाले आहेत. त्यांच्या फोटोंवर वेगवेगळ्या कॉमेण्ट्स करत आहेत. दोघंही फिटनेसबाबत सजग असून ते इंन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असतात.

उमेशने वयाच्या 47 व्या वर्षी केलेले हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते भारावले आहेत.

उमेश आणि प्रिया त्यांच्या या जबरदस्त लूकची सगळीकडे चर्चा आहे.

दोघांनी आपल्य़ा सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

दोघांच्या फोटोंवर दिड लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहेत. यामध्ये प्रियाचेही ॲब्स पहायला मिळत आहेत. तर त्यांच्या फोटोंवर कलाकारांनीही कॉमेण्ट करुन पसंती दिली आहे.

उमेशने या फोटोंखाली ‘फोकस’ आणि ‘डेडिकेशन’ असे लिहीले आहे. तर प्रियाने ‘एकत्र आल्यावर सामर्थ्य अधिक चांगलं दिसतं,’ असं कॅप्शन देत फोटो पोस्ट केला आहे.





























































