हे रंग म्हणजे फक्त होळी नाही तर एक चेतावणी आहे… प्रिया बापटच्या ‘डाळिंब’ चित्रपटाचे रहस्यमय पोस्टर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिच्या आगामी डाळिंब या हिंदी चित्रपटाचे पोस्टर आज होळीच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर अत्यंत रहस्यमयी असून त्या सोबत ‘हे रंग म्हणजे फक्त होळी नाही तर एक चेतावणी आहे’, अशी विचार करायला लावणारी कॅप्शन देखील देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यात प्रिया सोबत पंचायत फेम जितेंद्र कुमार देखील मुख्य भूमिकेत आहे. प्रिया अवेनने या चित्रपटाच्या लिखाणाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तनुज गर्ग व अतुल कसबेकर यांनी याची निर्मिती केली आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.

प्रियाने याआधी देखील ओटीटीवरील अनेक वेबसिरीज व चित्रपटात काम केले आहे. प्रिया व जितेंद्र दोघेही ओटीटीवरील लोकप्रिय कलाकार आहेत.