OMG! डोळा मारल्यानंतर प्रियाने केलं किस; व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर हिचा भुवया उडवून डोळे मारतानाचा व्हिडीओ तुफान गाजल्यानंतर आता तिच्या आणखी एका व्हिडीओने सोशल मीडियावर आग लावली आहे. प्रियाचा तिच्या ‘ओरू आदार’ या चित्रपटातील किसींग सिन व्हायरल झाला आहे. ‘ओरू आदार लव्ह’ हा चित्रपट रिलीज व्हायला अवघा एक आठवडा उरला असल्याने हा व्हिडीओ सिनेमाच्या प्रसिद्धीसाठीच व्हायरल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

‘ओरू आदार लव्ह’ या चित्रपटात शाळकरी मुलांची लव्ह स्टोरी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात प्रिया वॉरियर सोबत रोशन अब्दुल रौफ हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांचा डोळा मारतानाचा व्हिडीओ तुफान गाजला होता.  हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

दरम्यान, ‘प्रिया’ही श्रीदेवीच्या जीवनावर आधारित ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटातून श्रीदेवीची काही आक्षेपार्ह दृश्ये दाखविल्याचा आरोप करत बोनी कपूरने त्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.