दहावीच्या सीबीएससी 2023 गणिताच्या पेपरच्या अभ्यासासाठी टिप्स

>> प्रियल वाल्मिकी, BYJU’S ट्यूशन सेंटर, पुणे (महाराष्ट्र), अकॅडेमिक सेंटर हेड

दहावीची बोर्डाची परिक्षा हा विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीतला एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यात उत्साह आणि उत्सुकता तर बरीच असते पण त्याचवेळी मनात भीती आणि चिंताही असते. माझ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी मी कशाप्रकारे तयारी करू आणि त्यात अव्वल कामगिरी कशी करू हा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. त्यासाठी वेळाचा योग्यप्रकारे व अपेक्षित परिणामांसह वापर करणे तुमच्यासाठी पुरेसे आहे. तेव्हा धोरणीपणे आपल्या उजळणीचे नियोजन कसे करता येईल आणि गणिताच्या परीक्षेत अधिक चांगले मार्क कसे मिळवता येतील हे समजून घेण्यासाठी हा लेख तुमची मदत करेल.

1) आपल्याला कोणत्या धड्यातून अधिक मार्क मिळू शकतात हे माहीत असणे केव्हाही चांगले तेव्हा अभ्यासक्रमातील कोणत्या विभागांना किती गुण आखून देण्यात आले आहेत हे माहीत करून घ्या. ही गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे आहे – अल्जेब्रा – 20 गुण भूमिती – 15 गुण, ट्रिग्नोमेट्री – 12 गुण, स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी – 11 गुण, मेन्सुरेशन – 10 गुणे, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि नंबर सिस्टीम – प्रत्येकी 6 गुण. अभ्यासक्रमातून गाळलेला भाग बाजूलाच ठेवायला हवा हे ध्यानात ठेवा.

2) इथे वेग (SPEED) आणि अचूकतेचा (ACCURACY) फॉर्म्युला वापरात आणा व त्याला वेळेच्या व्यवस्थापनाची ( TIME MANAGEMENT, ) जोड द्या. यामुळे तुम्हाला आपल्या तयारीचा वेग वाढवता येईल आणि परीक्षेच्या काळात आपल्या वेळेची नीट विभागणी करता येईल. आणि यासाठी पेपर पॅटर्न व गुणांची पद्धत तुमच्या ओळखीची असायला हवी. 3 तासांच्या कालावधीत तुम्हाला एकूण 38 प्रश्न सोडवायचे असतात. तुमच्या परीक्षेच्या पेपरची ढोबळ रचना पुढीलप्रमाणे-

विभाग ए (प्रत्येकी 1 गुणांचे 20 प्रश्न) यात बहुपर्यायी प्रश्न (MCQs), गाळलेल्या जागा भरा आणि VSA प्रकारचे प्रश्न असतात. या विभागासाठी सुमारे 40 मिनिटांचा वेळ (प्रत्येक प्रश्नासाठी 2 मिनिटे) वापरला पाहिजे.
विभाग बी (प्रत्येकी 2 गुणांचे 5 प्रश्न) यात फॉर्म्युला आणि उपयोजनावर आधारित थोडक्यात उत्तरे अपेक्षित असणारे प्रश्न असतात. हा विभाग पूर्ण करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ (प्रत्येक प्रश्नाला 4 मिनिटे) पुरेसा असतो.
विभाग सी (प्रत्येकी 3 गुणांचे 6 प्रश्न) यात उपयोजन आणि सिद्धांतांवर आधारित थोडक्यात उत्तर द्या प्रकारातील प्रश्न असतात. या विभागाला 30 मिनिटे (प्रत्येक प्रश्नासाठी 5 मार्क्स) द्यायलाच हवीत.
विभाग डी (प्रत्येकी 5 गुणांचे 4 प्रश्न) यात फॉर्म्युला आणि सिद्धांतांवर आधारित दीर्घ उत्तरांसाठीचे प्रश्न असतात. या विभागासाठी 40 मिनिटांचा स्वतंत्र वेळ बाजूला ठेवायला हवा. (प्रत्येक प्रश्नासाठी 10 मिनिटे)
विभाग ई (प्रत्येकी 4 गुणांचे 3 प्रश्न) यात अरिथमॅटिक प्रोग्रेशन, कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि अॅप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमॅट्री या धड्यांतील केस स्टडीवर आधारित प्रश्न असतात. या विभागाला स्वतंत्र 30 मिनिटांचा एकूण वेळ द्यायला हवा.

उत्तर पत्रिका पुन्हा तपासून पाहण्यासाठी तुम्हाला 15-20 मिनिटांचा कालावधी लागणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा, तेव्हा व्यवस्थित नियोजनाची पद्धत वापरणे पुरेसे आहे.

3) गेल्या वर्षी आलेल्या प्रश्नांकडे (Previous year questions- PYQs) दुर्लक्ष करून चालणार नाही कारण एखाद्या धड्यातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याच्या कल्पनेसह केलेले नियोजनासाठी या प्रश्नांच्या प्रकाशात वाट दिसू शकते त्याचबरोबर योग्य तयारी केल्यानंतर आता आपण हे प्रश्न किती सहजगत्या सोडवून शकतो याविषयीच्या तुमच्या आत्मविश्वासालाही तयारी मिळते.

4) महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांची, थिओरम्स आणि ट्रिग्नोमॅट्री फॉर्म्युल्यांची यादी बनवायला विसरू नका आणि उजळणीच्या वेळी ते सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवा. लढाईच्या क्षेत्रात अर्थात तुमच्या परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी बारकाईने उजळणी करा.
5) गणिताच्या पेपरमध्येही सादरीकरणाने फरक पडतोच. तुम्ही तुमच्या विधानासाठी वापरलेले फॉर्म्युले आणि थिओरम्स लिहिले पाहिजेत, आकृत्या काढल्या पाहिजेत, पक्ष, साध्य, सिद्धतेचा भाग लिहिला पाहिजे. पायरीनुसार गुण देताना हे सगळे जमेस धरले जाते हे लक्षात ठेवा. परीक्षा सुरू झाल्याझाल्या तुम्ही ट्रिग्नोमॅट्रीचा (विभागासाठीचे गुण – 12) तक्ता पेपरच्या शेवटच्या पानावर लिहूनच टाका. त्याच उपयोग होईल.

6) प्रत्येक प्रश्न तुम्हाला आणखी गुण मिळवून देऊ शकतो याची तुम्हाला कल्पना हवी. कोणत्याही प्रश्नावर ठरवलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ रेंगाळू नका, त्यामुळे वेळ फुकट जातो, तेव्हा अशा प्रश्नांसाठी आपला आत्मविश्वास घालवून बसण्याच्या शक्यता टाळा.

वर दिलेल्या सगळ्या मुद्द्यांबरोबरच आपल्या शरीराचे वेळापत्रक सांभाळणेही महत्त्वाचे आहे. तेव्हा स्वत: वरचा विश्वास टिकवून ठेवण्याची योजना आखा आणि तुमच्या गणिताच्या पेपरमध्ये तुम्ही नक्कीच चांगले गुण मिळवू शकाल.