‘देसी गर्ल’ प्रियांकाला दमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राला घोडेस्वारीची आणि किटकांची भयंकर भीती वाटते.

सामना ऑनलाईन । मुंबई

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिला दम्याचा आजार झाला आहे. मला दम्याचा आजार आहे. यात लपवण्यासारखे काय आहे, असे म्हणत प्रियांकाने स्वतःच आजाराची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. मला चांगले माहिती आहे की, हा आजार कसा नियंत्रणात आणायचा. मला दमा असला तरी तो कधीच माझ्या आयुष्यातील लक्ष्य गाठण्यासाठी आडकाठी ठरू शकत नाही, किंबहुना मला रोखू शकत नाही, असे तिने ट्विटरवरून म्हटले आहे. सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट टाकून नेहमीच ऑक्टिव्ह राहणार्‍या प्रियांकाच्या या ट्विटने चाहत्यांना धक्का बसला आहे.