Photo – 20 वर्षे जुन्या चिकनकारी साडीला मॉडर्न टच, Gold Gala तील प्रियंकाचा लूक चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्राने पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्सने जगाला भुरळ घातली आहे. लॉस एंजेलिसमध्ये आयोजित ‘गोल्ड गाला 2026’ (Gold Gala 2026) या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रियांकाने हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या एका विशेष आऊटफिटन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाने तब्बल 20 वर्षे जुनी ‘चिकनकारी’ साडी पासून तय़ार केलेला एक सुंदर गाऊन परिधान केला आहे.

प्रसिद्ध डिझायनर अमित अग्रवाल यांनी प्रियंकाचा हा गाऊन डिझाईन केला आहे. हा गाऊन तयार करण्यासाठी तब्बल सहा आठवड्यांचा कालावधी लागला. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या या गाऊनवर अतिशय बारीक आणि कलाकुसरीचे काम करण्यात आले आहे.

अमित अग्रवाल यांनी गाऊनला दिलेला ‘थाय-हाय स्लिट’ (Thigh-high slit) आणि साडीच्या पदरासारखे केलेले ड्रेपिंग यामुळे या ड्रेसला एक वेगळाच लूक मिळाला आहे.

आपला लूक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने साडीला साजेसे दागिने आणि मेकअप केला आहे. गळ्यात डायमंड नेकलेस आणि सिंपल हेअरस्टाईलमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.

सोशल मीडियावर प्रियांकाचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून, चाहत्यांनी तिच्या या लूकचे कौतुक केले आहे. ‘ओल्ड इज गोल्ड’ म्हणत प्रियांकाने जुन्या कपड्यांना कशा प्रकारे नवा साज चढवता येतो, हे या निमित्ताने दाखवून दिले.