
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सोनिया गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी या अखेर सक्रीय राजकारणात उतरल्या आहेत. त्यांना पक्षाचं सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. गुलाम नबी आझाद यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आलं आणि ते प्रियांका गांधी यांना देण्यात आलं. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आझाद यांच्याकडे आता हरियाणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेश (पश्चिम)ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. के.सी वेणूगोपाल यांना देखील सरचिटणीसपद (संघटना) देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशासाठी काँग्रेसने पहिल्यांदाच दोन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे.
Priyanka Gandhi Vadra appointed Congress General Secretary for Uttar Pradesh East. pic.twitter.com/rkl57AFVzw
— ANI (@ANI) January 23, 2019
प्रियांका गांधी यांची सरचिटणीसपदी निवड झाल्यामुळे गांधी कुटुंबाचे पाठीराखे काँग्रेस कार्यकर्ते भयंकर आनंदीत झाले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांनी या निवडीबाबत बोलताना म्हटलंय की या निवडीचा फक्त त्यांच्याकडे उत्तर प्रदेशाच्या पूर्वेकडच्या भागावरच परीणाम होणार नसून संपूर्ण देशभरात फरक पडेल.
Senior Congress leader Motilal Vohra on Priyanka Gandhi Vadra appointed Congress General Secretary for Uttar Pradesh East: The responsibility given to Priyanka ji is very important. This will not only have an effect on eastern Uttar Pradesh but also other regions. pic.twitter.com/kYWCHBOEzP
— ANI (@ANI) January 23, 2019



























































