सरकार डरपोक है, कायर है, कायर है, ये सरकार कायर है! प्रियांका गांधींच्या घोषणांनी परिसर दणाणला

निवडणूक आयोगाविरोधात काढण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चाला पोलिसांनी रोखले. बिहारमधील मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरीच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत 300 विरोधी खासदारांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मोर्चाला अडवत पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना संसद पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेत असताना काँग्रेस नेत्या, खासदार प्रियांका गांधी यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हे सरकार डरपोक असल्याचा हल्लाबोल केला. व्होट चोर गादी सोडअशा घोषणा त्यांनी दिल्या. प्रियांका गांधी म्हणाल्या की, हे सरकार घाबरलं आहे. सरकार डरपोक आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतले. निदर्शनादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग यांची प्रकृती बिघडली आणि त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांनी मदत केली, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले.