
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचे आजोबा आणि दिग्गज चित्रपट निर्माते जे.ओम. प्रकाश यांचे बुधवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. दुपारच्या सुमारास मुंबईतील विले पार्ले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारामध्ये दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र यांच्या बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते सहभागी झाले.
बुधवारी सकाळी चित्रपट अभिनेते दीपक प्रकाश यांनी जे.ओम. प्रकाश यांच्या निधनाची बातमी ट्वीट करून दिली. एका तासापूर्वी माझे सर्वात आवडते काका जे.एम. प्रकाश यांचे निधन झाले. हिंदुस्थानी चित्रपटासाठी दिलेले योगदान एक उपहारासारखे आमच्याजवळ सोडून गेल्याचे ट्वीट त्यांनी केले. यासोबत त्यांनी एक महिन्यापूर्वी काढलेला फोटोही पोस्ट केला.
चित्रपट निर्माते जे.ओम. प्रकाश यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले. आपचे निर्माते, दिग्दर्शक आज सोडून गेले. एक दयाळू व्यक्ती, माझे शेजारी, ऋतिक रोशनचे आजोबा, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्वीट बिग बींनी केले.
T 3251 – J OM PRAKASH ji Producer Director of eminence, passed away this morning .. a kind gentle affable being .. my neighbor, Hrithik’s grandfather .. sad !! Prayers for his soul ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 7, 2019



























































