सनी देओलने माझी फसवणूक केली, निर्मात्याने केले गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सनी देओल हा बॉलिवूडमधल्या यशस्वी नायकांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सनीच्या बाबतीत कधीच सेटवरून कोणतीही नकारात्मक गोष्ट आतापर्यंत ऐकण्यात आली नव्हती. मात्र निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओलवर पैशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नुकतीच या सुनील दर्शन यांनी आरजे सिद्धार्थ कन्न यांना नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी 26 वर्षांपूर्वी घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी सनी व मी अजय या चित्रपटासाठी एकत्र काम करत होतो. पण चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करायच्या आधीच सनी लंडनला निघून गेला. त्यामुळे चित्रपटाचा अखेर मला व्यवस्थित करता आला नाही. मात्र तरिही तो चित्रपट चालला. सुपरहिट झाला.”, असे सुनील दर्शन यांनी सांगितले.

”त्यानंतर पुन्हा सनी माझ्याकडे चित्रपट मागायला आला. त्याने मला त्याला एक संधी द्यायला सांगितली. त्यामुळे मी त्याला माझ्या पुढील चित्रपटात घेतले. त्यासाठी त्याने सायनिंग अमांऊटचे पैसेही घेतले. मात्र त्याने चित्रपटासाठी तारखा देण्याचे काही ना काही कारणाने टाळले. अखेर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला व मी त्याच्याकडे माझे पैसे परत मागितले. एका माजी सरन्यायाधीशांसमोर आमचे याबाबत बोलणे सुरू होते. त्यावेळी सनी म्हणाला की माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत मात्र मी तुझा चित्रपट करेन. पण पुन्हा एकदा त्याने मला फसवायला सुरुवात केली. त्याने माझा चित्रपट केलाच नाही. अखेर मी पैसे मिळायची आशाच सोडली व तो चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याला घेऊन पूर्ण केला”, असे सुनील दर्शन यांनी या मुलाखतीत सांगितले.